MumbaiNewsUpdate : अनिल देशमुख यांच्याभोवती ईडीचाचा मोठा फास, दोन्हीही स्वीय सहाय्यकांच्या पोलीस कोठडीत वाढ

आरोपी म्हणतात आम्ही सचिन वाझे यांना ओळखत नाही !!
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोन्ही आरोपींच्या ईडी कोठडीत ५ दिवसांची वाढ केली आहे. दोघांनाही ६ जुलैपर्यंत ईडी कोठडीत राहावं लागणार आहे. पाच दिवसांपूर्वी सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी ईडीनं पुन्हा एकदा मोठे खुलासे केले. सुरुवातीला ईडीनं न्यायालयाकडे दोघांचीही सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र आता आरोपींच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
ईडीच्या अटकेत असलेले संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे दोघेही मध्यस्थ असल्याचे ईडीनं म्हटले आहे. तसेच ४ कोटी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाणार होते. हे पैसे कॅशमध्ये येत होते, असेही ईडीने सांगितले आहे. आरोपी चौकशीला सहकार्य करत नसून सचिन वाझेला ओळखत नसल्याचे आरोपी म्हणतात. आम्ही काही इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवले. तरी आरोपी सचिन वाझेला ओळखत नाही सांगतात, असे ईडीनं म्हटले आहे.
दरम्यान, आयपीएस अधिकाऱ्या बदल्या करण्यात येत होत्या. ती लिस्ट तपासायची आहे. बदली झालेल्या आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करायची असल्याचे ईडीने न्यायालयातम्हटले आहे. दोन्ही आरोपींचे आयकर डिटेल्ट तपासायचे असून मिळालेल्या कॅशचे काय झालं?, हे पैसे कुठे गेले याची चौकशी करायची असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
धक्कादायक म्हणजे,आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये काही इतर मंत्र्यांची नावे आली आहेत. त्यामुळे त्या यादीची तपासणी करायचे असल्याचेही ईडीनं म्हटलं आहे.मधल्या काळात १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आणि त्या परत रद्द केल्या गेल्या त्या का आणि कशाकरिता केल्या गेल्या याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा खुलासा ईडीचे वकील सुनिल गोंसवलीस यांनी केला आहे.