CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात १० हजार ८१२ रुग्णांना डिस्चार्ज , ६ हजार ७२७ नवे रुग्ण

मुंबई : गेल्या २४ तासात १० हजार ८१२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९५.९९ टक्के इतके आहे. तर आज ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून राज्यात आज १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या इतकी १ लाख १७ हजार ८७४ आहे.
मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असून गेल्या २४ तासात ७१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर एका दिवसात ६०८ नव्या रुग्णांची नोंद झालीआहे. आतापर्यंत मुंबईत एकूण ६ लाख ९४ हजार ७९६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या मुंबईत ८ हजार ४५३ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा वेग ७२८ दिवसांवर पोहोचला आहे. तर २१ जून ते २७ जून दरम्यान रुग्णवाढीचा दर हा ०.०९ टक्के इतका होता.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात रविवारी देशात ४६ हजार १४८ नवी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ५८ हजार ५७८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर रविवारी ९७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ एप्रिलनंतर देशात पहिल्यांदाच मृत्यांची संख्या १ हजारांच्या आत नोंदवली गेली आहे.