IndiaPoliticalUpdate : स्वबळावरच लढणार , एमआयएमशी युतीचे वृत्त पूर्णतः चुकीचे : मायावती

लखनौ : उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचे ट्विट बसपा नेत्या मायावती यांनी जाहीर केलं आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, त्यावर मायावतींनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे कि , बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही.
1. मीडिया के एक न्यूज चैनल में कल से यह खबर प्रसारित की जा रही है कि यूपी में आगामी विधानसभा आमचुनाव औवेसी की पार्टी AIMIM व बीएसपी मिलकर लड़ेगी। यह खबर पूर्णतः गलत, भ्रामक व तथ्यहीन है। इसमें रत्तीभर भी सच्चाई नहीं है तथा बीएसपी इसका जोरदार खण्डन करती है। 1/2
— Mayawati (@Mayawati) June 27, 2021
बसपा प्रमुख मायावतींनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे, ”माध्यामातील एका वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभेची निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसपा एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, अफवा पसरवणारे, तथ्यहीन आहे. यामध्ये काडीमात्रही सत्य नाही. बसपा या वृत्ताचे खंडण करते.” तसेच, ”या संदर्भात पार्टीकडून पुन्हा असे स्पष्ट केले जाते की, पंजाब सोडून उत्तरप्रदेश व उत्तराखंड मधील पुढील वर्षी सुरू होणाऱ्या विधानसभेची निवडणूक बीएसपी कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजे, स्वबळावरच निवडणूक लढवणार.”
यासंदर्भात संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बसपाने, आता राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्र यांना बीएसपी सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे. पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
“पंजाबमध्ये आज शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीची आघाडी, ही एक नवी राजकीय व सामाजिक सुरूवात आहे. जे की नक्कीच इथे राज्यात जनतेचा बहुप्रतीक्षित विकास, प्रगती व आनंदाच्या नव्या युगाची सुरूवात करेल. या ऐतिहासिक पावलासाठी लोकांचे हार्दिक अभिनिंदन व शुभेच्छा.” असेही मायावती यांनी म्हटले आहे.