ElectionNewsUpdate : सामाजिक परिस्थिती बिकट झाल्यास निर्णय बदलण्याचे अधिकार आयोगाला : मदान

औरंगाबाद – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका निवडणूक आयोगाने जाहिर केल्यानंतर सामाजिक परिस्थिती बिकट झाल्यास योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाआहे पण तशी गरज भासणार नाही.असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी ‘ महानायक’ शी बोलतांना केले.
राज्यात निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहिर केल्यानंतर राज्यमंत्रीमंडळातले कॅबीनेट मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाजाला त्याची जबर किंमत मोजावी लागत असल्याचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा नव्याने ओबीसींचा इंपीरिकल डाटा सादर करुन पुर्नविचार याचिका सादर करावी त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ंनिवडणूकांची घोषणा करावी अशी भूमीका दोन्ही मंत्र्यांनी घेतली. तसेच एकीकडे भाजपाही उद्या २६जून रोजी राज्यभर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करंतआहे.