Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

Spread the love

मुंबई : मुंबईत ड्रग्ज प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली आहे. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकर याचा हात असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली होती. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर इक्बालला एनसीबीने अटक केली आहे. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून चौकशीसाठी कस्टडीची मागणी एनसीबी अधिकारी करतील.

गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठ्या कारवाया  केल्या आहेत. या कारवाईत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपयांत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत कारवाई करुन ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत. याच कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचं एनसीबीच्या लक्षात आले. त्यानंतर आता एनसीबीने ही कारवाई केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!