AurangabadNewsUpdate : भाईचंद रायसोनी बँकेच्या फसवणुक प्रकरणात कारवाई , १२ संशयितांना घेतले ताब्यात

औरंगाबाद : राज्यातील नामवंत भाईचंद रायसोनी बँकेच्या फसवणुक प्रकरणात राज्यात अनेक ठिकाणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची छापेमारीचे सत्र सुरु केले आहे. यातच औरंंगाबाद शहरातील आदर्श महिला बॅंकेचे संचालक अंबादास मानकापे यांना पुणे पोलिसांनी सकाळी साडे सहाच्या दरम्यान संशयातून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. यामुळे औरंंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्याच्या अर्थीक गुन्हे शाखेने पहाटे पासूनच पुणे, जळगावात आणि औरंगाबाद येथे छापेमारी करत अनेक नामांकीत उद्योगपती सह काही राजकारण्यांना ताब्यात घेतले आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या १५ टीमकडून एकाच वेळी ही कारवाई झाली आहे. यासंदर्भात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ही माहिती दिली आहे.
भाईचंद रायसोनी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी जळगाव आणि पुण्यात छापेमारी करत, जळगावचे प्रसिद्ध उद्योगपती प्रेम नारायण कोगटा, मा. मंत्री गिरीष महाजनांचे स्विय सहाय्यक जितेंद्र रमेश पाटील भाजपाचे माजी नगरसेवक छगन झाल्टे, यांच्यासह औरंगाबादच्या आदर्श महीला बँकेचे चेअरमन अंबादास आबाजी मानकापे तसेच धुळे आणि मुंबई येथे छापे टाकत अनेक नामांकीत उद्योगपतीना ताब्यात घेतले. त्यांच्यावर जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी बँकेच्या फसवणूक आणि अपहार केल्याचा संशय असून, या सर्वांना प्रछापेमारी करत ताब्यात घेतल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. भाईचंद बँकेत १ हजार कोटीचा घोटाळा झाल्याची चर्चा असून या बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राज्यातील एका माजी मंत्र्याचे नाव समोर येत असल्याचे बोलले जात आहे.
या संशयितांना घेतले ताब्यात
भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव, यांना पुण्यातील हॉटेलातून अटक) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला)