Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, आमची हरकत नाही : छगन भुजबळ

Advertisements
Advertisements
Spread the love

ओबीसी आरक्षणासाठी समता परिषदेचाही आता आंदोलनाचा इशारा


नाशिक :  एकीकडे  राज्यात मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु झालेले असतानाच ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडीतील मंत्री आणि काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही  ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनासाठी दंड थोपटले आहेत.  या मागणीसाठी भुजबळ यांच्या समता परिषदेने  राज्यभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची काहीही हरकत नाही असेही भुजबळ यावेळी म्हणाले.


नाशिकमध्ये आज छगन भुजबळ यांच्या निवास्थानी झालेल्या  बैठकीत ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यानंतर आता रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी समता परिषदेने  घोषणा केली आहे. ‘समता परिषदेचे हे आंदोलन  ओबीसी आरक्षण बचावासाठी असून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने यावर मार्ग काढावा यासाठी ओबीसी समाज आंदोलन करणार आहे. ओबीसी समजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समजाला आरक्षण द्यावे, यासाठी आमची  काही हरकत नाही. कोर्टात विषय संपला म्हणजे आरक्षण विषय संपला असे  नाही, असेही भुजबळ म्हणाले.

Advertisements

दरम्यान मराठा आरक्षण यासाठी घटना दुरूस्ती झाली पाहिजे अस काहींचे मत आहे ते  काही चुकीचे  नाही. परभणी येथे ओबीसी आंदोलकांवर गुन्हे दाखल होत आहेत, काही ठिकाणी इतर समाज आंदोलन करतात मग येथेच गुन्हे दाखल का, असा सवाल करत भुजबळ यांनी स्वत:च्या सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याच बरोबर विजय वड्डेटीवार यांनी ओबीसी समाजासाठी  जो मेळावा आयोजित केला आहे तिथेही आपण जाणार असल्याचे सांगून भुजबळ म्हणाले कि , उद्यापासून समता परिषद ओबीसी आंदोलन करत असून योग्य वेळी मी  त्यात सहभागी होईल.

Advertisements
Advertisements

समता परिषद म्हणजे छगन भुजबळ यांनी उभारलेली संघटना आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात त्यांनी घेतलेले मेळावे, लाखोंच्या संख्येनं त्यांना मिळालेला प्रतिसाद, या आठवणी आजही जिवंत आहेत. मधल्या काही वर्षात,समता परिषदेची सक्रियता काही दिसायला तयार नव्हती. आता पुन्हा एकदा ओबीसींना एकत्र करून त्यांची मोट भुजबळ बांधत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!