IndiaNewsUpdate : ऐकावे ते नवलच : कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या नवजात वासराचे सीरम असल्याने खळबळ !!

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी देशभरात लसीकरणाची मोहीम प्रगतीपथावर असतं भारतात तयार करण्यात आलेल्या कोवॅक्सिन लसीमध्ये गायीच्या नवजात वासराचे सीरम वापरण्यात आल्याचा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेत्याने आरटीआयचा पुरावा देत हा दावा केल्यानंतर आता मोदी सरकारसह, ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीनेही यावर स्पष्टीकरण दिले आहे. कोवॅक्सिन लशीसाठी गायीच्या वासराच्या सीरमचा वापर करण्यात आला, अशी पोस्ट काँग्रेस नेते गौरव पांधी यांनी केली. या लशीसाठी २० दिवसांपेक्षाही लहान गायीच्या वासराच्या सीरमचा वापर करण्यात आल्याचा दावा केला आणि सरकारने याबाबत आधी माहिती का दिली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
याबाबत गौरव यांनी ट्वीट केले आहे कि , “आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरात मोदी सरकारने मानलं आहे की कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराच्या सीरमचा वापर होतो. यामध्ये २० दिवसांपेक्षा कमी वयाच्या वासराला मारून त्याचा वापर होतो. हा गुन्हा आहे. ही माहिती सर्वांसमोर आधीच यायला हवी होती” या पोस्टनंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावर मोदी सरकार आणि या लशीची निर्मिची करणाऱ्या भारत बायोटेकनंही उत्तर दिलं आहे.
सरकारचे म्हणणे असे आहे…
लस निर्मितीत व्हिरो सेल तयार करण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी वासराच्या सीरमचा वापर झाला आहे. व्हायरस कल्चर करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. याआधी पोलिओ, रेबीज, इन्फ्लूएंझा लशीतही या पद्धतीचा वापर झाला आहे. या व्हिरो सेल्सची वाढ झाल्यानंतर ते स्वच्छ केले जातात. त्यावर वासराच्या सीरमचा अंशही ठेवला जात नाही. त्यानंतर हे व्हिरो सेल्स कोरोनाव्हायरसने व्हायरल ग्रोथसाठी इन्फेक्टे केले जातात. व्हायरल ग्रोथच्या प्रक्रियेत व्हिरो सेल्स पूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर हा व्हायरसही निष्क्रिय आणि शुद्ध केला जातो. हा निष्क्रिय व्हायरस लशीसाठी वापरला जातो. लशीच्या शेवटच्या फॉर्म्युल्यात वासराच्या सीरमचा वापर होत नाही”, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
भारत बायोटेकचा खुलासा असा आहे…
“लस निर्मिती प्रक्रियेत वासराच्या सीरमचा वापर केला जातो. हा वापर पेशींच्या विकासासाठी असतो. पण कोरोनाव्हायरसची वाढ आणि शेवटच्या फॉर्म्युल्यात याचा वापर झालेला नाही. ही लस पूर्णपणे शुद्ध आहे. त्यातील सर्व अशुद्धता हटवण्यात आली आहे. लस निर्मितीसाठी वासराच्या सीरमचा वापर कित्येक दशकांपासून जगभरात होतो आहे. गेल्या नऊ महिन्यांत याबाबत सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर माहिती देण्यात आली आहे”