IndiaNewsUpdate : कोरोनाचा “डेल्टा व्हेरिअंट” आता म्यूटेट होऊन “डेल्टा प्लस” झाल्याने चिंता वाढली , मास्क हाच एकमेव पर्याय पण…

नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे एम्सचे प्राध्यापक डॉ. अमरिंदर सिंग मल्ली यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट आता म्यूटेट होऊन डेल्टा प्लस विषाणू तयार झाला आहे. याआधी भारतात जेव्हा सिंगल व्हेरिअंट आढळून आला होता तेव्हा तो आधीच्या विषाणूपेक्षा दुप्पट वेगाने पसरत असल्याचे दिसून आले होते. देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं सर्वांची झोप उडवली आहे. कोरोनाच्या विषाणूने आता रुप बदलले असून या नव्या व्हेरिअंटचं नाव आहे ‘डेल्टा प्लस’.
दरम्यान संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डेल्डा व्हेरिअंटने सर्वांना बाधित केले . पण आता “डेल्टा प्लस” व्हेरिअंटच्या बाबतीत जीनोम सिक्वेसिंगकडून ज्यापद्धतीचा अहवाल आला आहे ते पाहता आता कोरोना संक्रमणाचा दर आता आणखी वेगाने वाढू शकतो, असे अमरिंदर सिंग मल्ली म्हणाले. इतकंच नव्हे, तर डेल्टा प्लस व्हेरिअंटच्याबाबतीत सुरुवातीच्या दाव्यांमध्ये असंही सांगितलं जात आहे की या व्हेरिअंटवर बहुतेक औषधं कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांसाठी डेल्टा प्लस व्हेरिअंट चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे डेल्टा प्लस व्हेरिअंटचा प्रतिकार करण्यासाठी जगातील काही लस निर्मात्या कंपन्यांनी त्यांची लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. तर भारताच्या दोन लसींचा डेल्ट प्लस व्हेरिअंटवरील प्रभावाबाबत संशोधन अद्याप सुरू आहे. भारतीय लस डेल्टा प्लस व्हेरिअंटवर प्रभावी आहे किंवा नाही याची तपासणी सध्या केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
मास्क हाच एकमेव पर्याय पण…
आयएमसीआरच्या अहवालानुसार देशात ५० टक्के नागरिक मास्क योग्य पद्धतीने वापरत नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. कोरोनावर कोणत्याही औषधांपेक्षा मास्क हेच उत्तम आणि प्रभावी शस्त्र आहे, असे डॉ. अरविंदर मल्ली यांनी सांगितले . मास्कचा सुयोग्य आणि काटेकोर पद्धतीने वापर केला तर या नव्या व्हेरिअंटपासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता, असेही ते पुढे म्हणाले.