AurangabadNewsUpdate : पोलिसआयुक्तालयाकडून चांगली कामगिरी , जप्त ३४ मोटरसायकल पैकी २२ मूळ मालकांना परत

औरंगाबाद – चोरट्यांकडून जप्त केलेल्या ३४ मोटरसायकल पैकी २२मोटरसायकल मूळ मालकांना पोलिसआयुक्तालयाने कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत केल्या. यामुळे नागरिकांंचा पोलिसांविषयी असलेला विश्वास दुणावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रेकॉर्डवरील गौसखाँ पठाण याने शेतकरी मित्राच्या मदतीने शहरातील जामा मस्जिद, कँन्सर रुग्णालय, शहागंज भाजी मंडीमधून मोटरसयकल चोरुन जालना जिल्ह्यातील भोकरदन परिसरात त्या विकल्या होत्या.सिटीचौक पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्यानंतर जप्त केलेल्या मुद्देमालापैकी २२मोटरसायकल मूळ मालकांना परत करता येतात असा निष्कर्ष निघाला.त्यानुसार पूर्तता करुन पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्या हस्ते मोटरसायकल परंत करण्यात आल्या यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ, बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे , पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांची उपस्थिती होती.