MaharashtraEducationUpdate : बारावी बोर्डाची परीक्षा रद्दच , मंडळाचे परिपत्रक जारी

मुंबई : एप्रिल मे मध्ये घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा कोरोनाच्या महासाथीमुळे पुढे ढकलून जून महिन्यात घेण्यात येणार होती. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी न झाल्याने आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे.
अद्यापही राज्यातून कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. अशावेळी एका जरी विद्यार्थ्याच्या घरात कोरोचा रुग्ण असेल तर तो अधिक पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने १२ वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द (करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय सीआयएससीई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.