CoronaMaharashtraNewsUpdate : राज्यात १० हजार ४४२ नवे रुग्ण तर ७ हजार ५०४ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ४४२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ५०४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एका दिवसात ४८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ५९ लाख ८ हजार ९९२ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५६ लाख ३९ हजार २७१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे एकूण १ लाख ११ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख ५५ हजार ५८८ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान राज्यात आज ४८३ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी २८४ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १९९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
Maharashtra reports 10,442 new #COVID cases, 7,504 recoveries and 483 deaths today.
Total cases: 59,08,992
Total recoveries: 56,39,271
Death toll: 1,11,104Active cases: 1,55,588 pic.twitter.com/GGMTvByO4u
— ANI (@ANI) June 13, 2021
राज्यात रुग्ण बरे होण्याच प्रमाण ९५.४४ टक्के इतकं आहे. तर मृत्यू दर १.८८ टक्के इतका आहे. सध्या ९ लाख ६२ हजार १३४ करोना रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ६ हजार १६० रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईतील करोना स्थिती
मुंबईत एकूण ७ लाख १५ हजार ६६० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ६ लाख ८० हजार ८२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर १५ हजार १८३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत १८ हजार १६६ सक्रिय रुग्ण आहेत.
पुण्यातील करोना स्थिती
पुण्यात आतापर्यंत एकूण १० लाख ३५ हजार २४३ जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी १० लाख १ हजार ८२६ जणांनी करोनावर मात केली. करोनामुले आतापर्यंत १५ हजार १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात १८ हजार ५७१ सक्रिय रुग्ण आहेत.
बुलडाण्याच्या वस्तुस्थिती
महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंधही शिथिल केले आहेत. याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे राज्यातील एक जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची. होय, कारण या जिल्ह्यात आता सक्रिय रुग्ण संख्या ही शून्य झाली असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, आता यासंदर्भात आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकार दररोज आकडेवारी जाहीर करत असते. आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय रुग्ण संख्या ही शून्य झाली आहे. मात्र, आज जिल्ह्यात नव्याने ६९ रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची नोंद सक्रिय रुग्णसंख्येत झालेली नाहीये तांत्रिक तृटीमुळे हा घोळ झाला असल्याची माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना दिली. सध्या स्थितीत आता बुलडाणा जिल्ह्यात ६९ सक्रिय रुग्ण आहेत. आकडेवारीनुसार, बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ८२,१०१ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यापैकी ८१, ४६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ६३५ रुग्णांचा कोरोनामुळे तर पाच जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला आहे.