IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी बोलणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर कुठे आटोक्यात येत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास जनतेशी संवाद साधणार आहेत .
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांची संख्या देशात १ लाख ६३६ इतकी आढळून आली आहे. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांची म्हणजेच उपचार घेणाऱ्यांची संख्याही १४ लाखांपर्यंत कमी झाली आहे. तर लसीकरण मोहीमेत आतापर्यंत २३ कोटींहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Prime Minister Shri @narendramodi will address the nation at 5 PM today, 7th June.
— PMO India (@PMOIndia) June 7, 2021