CoronaInformationUpdate : कोरोनाला घाबरू नका , समजून घ्या नव्या गाईडलाईन !!

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनावरील उपचारासाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करत नव्या सूचना जारी केल्या आहेत. यानुसार ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत त्यांना कुठल्याही औषधं घेण्याची गरज नाही. पण दुसऱ्या आजारांसाठी जी औषधं सुरू आहेत ती घेत रहावीत. अशा रुग्णांनी टेली कन्सल्टेशन घेतले पाहिजे. चांगला आहार , मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्विसेसने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार कोरोनाची लक्षण दिसत नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येणारी सर्व औषधं यादीतून हटवण्यात आली आहेत. यात ताप आणि सर्दी-खोकल्याच्या औषधांचाही समावेश आहे. अशा रुग्णांना इतर चाचण्या करण्याची गरज नाही, असे सूचनांमध्ये म्हटले आहे. यापूर्वी २७ मे रोजी मार्दगर्शकसूचना जारी करण्यात आल्या होत्या. ज्यात सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, आइवरमेक्टिन, डॉक्सीसाइक्लिन, जिंक आणि मल्टीविटामिन या औषधांच्या वापरास मनाई करण्यात आली होती. तसेच एसिम्प्टेमेटीक म्हणजे लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन सारख्या अनावश्यक चाचण्या लिहून देण्यासही मनाई करण्यात आली होती.