CoronaIndiaUpdate : दिलासादायक : देशातील कोरोना रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत घट

नवी दिल्ली : देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 58 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,20,529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,380 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,86,94,879 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,44,082 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (5 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 15,55,248 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,67,95,549 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटले आहे. मात्र या लाटेपासून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाने अतिशय चांगल्या प्रकारे सामना केला आहे. यामुळे कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पण तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारीही तेवढीच उत्तम झाली पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशातील व्यवस्थापन चांगले होते. यामुळेच दुसऱ्या लाटेला लवकर नियंत्रित करण्याचा विश्वास आपल्याला मिळाला. दुसऱ्या लाटेतही कोरोना व्यवस्थापन म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन चांगले होते, असे म्हटले आहे. देशात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले पाहिजे असेही सारस्वत यांनी सांगितले . आपण बऱ्याच अंशी चांगले काम केले आहे. आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगल्या प्रकारे सामना केला आहे. यामुळेच आता रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचेही ते म्हणाले.
India reports 1,20,529 new #COVID19 cases, 1,97,894 discharges, and 3,380 deaths in the last 24 hours, as per Health Ministry
Total cases: 2,86,94,879
Total discharges: 2,67,95,549
Death toll: 3,44,082
Active cases: 15,55,248Total vaccination: 22,78,60,317 pic.twitter.com/oF9tm1scaX
— ANI (@ANI) June 5, 2021