CoronaMaharashtraUpdate : राज्यात आज 14,152 नवीन रुग्णांची नोंद , 289 मृत्यू , सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घट

मुंबई : राज्यात आज तर 14,152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 20,852 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 289 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे.
राज्यात आज एकूण 1,96,894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 55,07,058 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.86% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान मुंबईत गेल्या 24 तासात 973 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1207 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,76,400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,347 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 515 दिवसांवर पोहोचला आहे.