#AurangabadCrimeUpdate : सायबर पोलिसांची कामगिरी, बिहारमधून भामट्याला अटक

आॅगस्ट २०२० मधे वाळूज परिसरातील उद्योजकाला ५६ लाखांचा गंडा घालणार्या भामट्याला सायबर पोलिसांनी २ जून रोजी बिहार मधील नवादा जिल्ह्यातीव पकारीबरवा पोलिस ठाण्याच्या द्दीतून बेड्या ठोकून कोर्टापुढे हजर केले. त्याला एक आठवड्याची पोलिस कोठडी मिळाली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिसआयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली.
नितीशकुमार जितेंद्रप्रसाद (२४) असे अटक आरोपीचे नाव आहे. शहरासह आरोपीने महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील नागरिकांची २५ लाखांची फसवणूक केल्याची माहिती सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघंड झाली असून सायबर पोलिस चारही राज्यातील सायबर पोलिस ठाण्यांना कळवून गुन्ह्याबाबत माहिती घेत आहेत.
आरोपी नितीशकुमारने भारत पेट्रोलियमची बोगस वेबसाईट तयार करुन एल.पी.जी.एजन्सी डिस्र्टीब्यूशन अधिकारी असल्याच्या थापा नागरिकांना मारुन फसवले आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील उद्योजक चांगदेव तांदळे यांना आॅगस्ट २०२०मधे पेट्रोलपंप देण्याच्या नावाखाली ५६ लाख ६१हजार ७००रु.चा गंडा घातला होता.या गुन्ह्राचा तपास पूर्वी आर्थिक गुन्हेशाखा करत होती. पण त्यानंतर पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या आदेशाने हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांनी तांत्रिक विश्र्लेषणाद्वारे तपास करुन तपास पूर्ण केला. या कारवाईत पोलिस निरीक्षक बागवडे यांच्यासह पीएसआय राहूल चव्हाण,कर्मचारी विवेक औटी,संजय सावळे,गोकुळ कुतरवाडे,छाया लांडगे यांनी सहभाग घेतला होता.