क्या बात है !! कुठला कोण कृष्णन ? पण त्याला युसूफअलींनी दिले जीवदान…

भारतात बऱ्याचदा जाती – धर्म पाहून एकमेकांना मदत करण्याचा प्रघात आहे पण भारतातल्याच संयुक्त अरब अमिरातीमधील एका युसूफअली नावाच्या उद्योजकाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कृष्णन नामक एका भारतीयाची सुटका केली असल्याचे वृत्त आहे. अनिवासी भारतीय उद्योजक एम. ए. युसूफअली यांनी त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपये ‘ब्लड मनी’ भरून कृष्णनला जीवदान दिले.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , मूळचा केरळचा असलेल्या कृष्णनकडून वर्ष २०१२ मध्ये एक कार अपघात झाला होता. या अपघातात एक सुदानी मुलगा ठार झाला. या प्रकरणाची सुनावणी करताना संयुक्त अरब अमिरातीच्या सुप्रीम कोर्टाने कृष्णनला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. कृष्णनला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयानी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते. तर, ठार झालेल्या सुदानी मुलाचे कुटुंबीय सुदानला परतले. त्यामुळे चर्चा करून समेट घडवण्याचा मार्गही थांबला होता.
दरम्यान कृष्णनच्या कुटुंबीयांनी लूलू ग्रुपचे अध्यक्ष युसूफअली यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून कृष्णनच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर अपघातात ठार झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांसोबत जानेवारी २०२१ मध्ये संपर्क साधण्यास यश आले. त्यांनीही मोठे मन करत कृष्णनला माफ केले. त्यानंतर युसूफअली यांनी कोर्टाकडे पाच लाख दिऱ्हम (जवळपास एक कोटी रुपये) इतकी रक्कम भरली आणि कृष्णनची सुटका केली.
ब्लड मनी आहे तरी काय?
संयुक्त अरब अमिरातीमध्ये “ब्लड मनी” हा न्याय करण्याचा प्रकार समजला जातो. हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाईच्या रक्कमेला “ब्लड मनी” म्हटले जाते. ही रक्कम दोषीकडून देण्यात येते. त्याबदल्यात पीडित कुटुंबाकडून दोषीला माफ केले जाते. पीडित कुटुंबाची सहमती असल्याशिवाय ‘ब्लड मनी’चा पर्याय अंमलात येत नाही.