IndiaNewsUpdate : पंतप्रधान आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस लसींच्या मुद्द्यावर चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांच्यात गुरुवारी फोनवरून चर्चा झाली. लसीच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये भारत-अमेरिकेतील सहकार्यावर चर्चा झाली, अशी माहिती पतंप्रधान मोदी यांनी ट्वीट करून दिली आहे. जागतिक पातळीवर लसींच्या पुरवठ्याबाबत अमेरिकेच्या रणनीतीचा भाग म्हणून भारताला लसींचा पुरवठा करण्याच्या आश्वासन कौतुकास्पद आहे. भारत- अमेरिकेत लसींच्या मुद्द्यावर सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरही आम्ही चर्चा केली, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
दरम्यान जागतिक पातळीवरील स्थिती सामान्य झाल्यानंतर अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांना पंतप्रधान मोदींनी भारत भेटीचे निमंत्रण दिले. दोन्ही नेत्यांनी लस निर्मिती क्षेत्रात अमेरिका आणि भारतासह इतर देशांना आरोग्यसंबंधीच्या पुरवठ्याची साखळी बळकट करण्यासाठीच्या प्रयत्नांवर चर्चा केली. भारत-अमेरिकेतील भागिदारीसह साथीच्या आजारावरील दीर्घकालीन आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी लस उपक्रमावर प्रकाश टाकला, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली.
PM Modi speaks to US Vice-President Kamala Harris
"I deeply appreciate the assurance of vaccine supplies to India as part of the US Strategy for Global Vaccine Sharing. We also discussed ongoing efforts to further strengthen India-US vaccine cooperation," says PM pic.twitter.com/1RegrIm4G9
— ANI (@ANI) June 3, 2021