CoronaIndiaUpdate : भारतातील आजची कोरोना स्थिती : एक नजर

भारतातील आजची कोरोना स्थिती : एक नजर
एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 78 लाख 94 हजार 800
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 54 लाख 54 हजार 320
एकूण सक्रिय रुग्ण : 21 लाख 14 हजार 508
एकूण मृत्यू : 3 लाख 25 हजार 972
देशात गेल्या 24 तासांत 1.65 लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद
देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3460 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 76 हजार 309 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजेच, एका दिवसापूर्वी शुक्रवारी 173,790 तर गुरुवारी 186,364 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.16 टक्क्यांवर, तर रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.16 टक्क्यांवर आहे. तर रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 8 टक्क्यांहून कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. दरम्यान 8 मे रोजी कोरोनाने कहर पाहायला मिळाला. या दिवशी 3 लाख 91 हजार 263 रुग्ण आढळून आले होते. मात्र शनिवारी 1 लाख 95 हजार 183 नव्या रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच 8 मे रोजीच्या तुलनेत हा आकडा 50 टक्क्यांनी कमी आहे.
दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 7 दिवसात सरासरी मृतांचा आकडा पाहिल्यास तो 18 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 16 मे रोजी 4 हजार 40 रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला होता. मात्र सध्या ही संख्या 3 हजार 324 च्या वर आहे. चिंतेची बाब म्हणजे, मृतांचा आकडा सध्या 3 हजारच्या खाली येत नाही आहे. शनिवारी 3 हजार 80 रुग्णांचा मृत्यू झाला. 16 मे रोजी सात दिवसांच्या सरासरीने दैनंदिन मृतांचा आकडा 4040 पर्यंत पोहोचला होता. सध्या ही संख्या 3324 इतकी आहे. देशात कोरोना महामारीमुळे होणाऱ्या दैनंदिन मृतांची संख्या आतापर्यंत 3 हजारांहून खाली आलेली नाही. शनिवारी देशात या व्हायरसमुळे 3080 मृत्यू झाले आहेत. जे गेल्या काही दिवसांतील आकड्याच्या तुलनेत जवळपास सारखीच होती.