CoronaIndiaUpdate : दिलासादायक : देशात कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चिंता निर्माण केली असली तरी देशात काही प्रमाणात दिलासादायक वातावरण आहे. सलग दुसर्या दिवशी देशात दोन लाखांहूनही कमी कोरोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात एकूण १.७३ लाख नवीन करोना रुग्ण आढळले. जे गेल्या ४५ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. या कालावधीत ३६१७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या सलग १६ व्या दिवशी बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या एका दिवसातच २.४८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या रिकवरी रेट ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात सध्या करोनाची एकूण २२,२८,७२४ सक्रिय प्रकरणे आहेत.
१२ एप्रिल नंतर आज (शुक्रवार) नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र करोनामुळे मृत्यूंची संख्या सध्याही चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात १०,०२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये ४८६ लोकांचा मृत्यू झाला. तसेच तामिळनाडूत ३१,००० नवीन करोना रुग्ण आढळले. तर कर्नाटकमध्ये २३,००० करोना बाधित आढळले असून करोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्यामुळे देशात अनेक राज्यातील लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आतापर्यंत देशात २२,२८,७२४ लोकांचे लसीकरण झाले आहे.
कोरोना एक नजर
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण, 2,84,601 जणांना डिस्चार्ज
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण
गेल्या 24 तासात 2 लाख 84 हजार 601 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
देशात 22 लाख 28 हजार 724 जणांवर सध्या उपचार सुरु
गेल्या 15 दिवसात बाधीत पेक्षा डिस्चार्ज आकडा मोठा