IndiaNewsUpdate : तपास यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन घोटाळेबाज मेहुल चोक्सी उडाला…!!

नवी दिल्ली : तपास यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन पंजाब नॅशनल बँकेच्या १४००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मूळ सूत्रधार मेहुल चोक्सीने अॅंटिग्वामधून पळ काढल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चोक्सीची चौकशी चालू असताना तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०१८ मध्ये मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांनी भारतातून पलायन केले होते. चोक्सी कॅरेबियन देश अॅंटिग्वा आणि बार्बुडामध्ये लपून होता. मात्र अॅंटिग्वान्यूजरूम या स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार चोक्सी रविवारपासून बेपत्ता आहे. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला आहे. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे पोलीसांनी चोक्सीचा शोध सुरु केला आहे.
विशेष म्हणजे एकीकडे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आणखी एक आरोपी नीरव मोदी याचे प्रत्यार्पण अंतिम टप्प्यात असताना मेहुल चोक्सीने पलायन केल्याने केंद्र सरकारसाठी हा मोठा झटका आहे. दरम्यान चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरु होती. त्याचा अंदाज घेत चोक्सीने अॅंटिग्वामधून पलायन केल्याचे सांगितले जात आहे. चोक्सीकडे अॅंटिग्वाबरोबरच इतर कॅरेबियन देशांचे सुद्धा नागरिकत्व असल्याचा संशय आहे. त्यामळेच कॅरेबियन बेटांवर त्याचा मुक्त संचार असतो अशी तपास यंत्रांची माहिती आहे. अॅंटिग्वाच्या जॉन्सन पॉइंट पोलीस स्टेशनमध्ये मेहुल चोक्सीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच चोक्सी दिसल्यास कळवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी स्थानिक जनतेला केले आहे.
Fugitive diamantaire Mehul Choksi has gone missing. His family members are worried & anxious, and they had called me to discuss. Antigua Police is investigating: Choksi's lawyer, advocate Vijay Aggarwal to ANI
(File photo) pic.twitter.com/TKEnGCBqt0
— ANI (@ANI) May 24, 2021
दरम्यान, चोक्सीकडे अॅंटिग्वाचे नागरिकत्व असले तरी त्याचे शेजारील देश क्युबामध्ये आलिशान घर आहे. तो क्युबामध्ये पळून गेल्याचा संशय आहे. क्युबामधील स्वतःच्या घरात तो सध्या राहत असल्याचे बोलले जाते. गुंतवणूक कराराअंतर्गत चोक्सी याने २०१७ मध्ये कॅरेबियन देशांचा पासपोर्ट आणि नागरिकत्व मिळवले होते.