IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर योगगुरू रामदेव यांनी दिले उत्तर

नवी दिल्ली : अॅलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत योगगुरु रामदेव यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आपले वक्तव्य आपण घेत असून आपण WhatsApp वरचा मॅसेज वाचून दाखवत होतो , एकूणच आधुनिक विज्ञान , डॉक्टर्स आणि अॅलोपॅथी यांचा आपण सन्मानच करतो मात्र त्यांनीही भारतीय चिकित्सापद्धतीचा आदर करायला हवा असे उत्तर देऊन खेड प्रकट केला आहे.
माननीय श्री @drharshvardhan जी आपका पत्र प्राप्त हुआ,
उसके संदर्भ में चिकित्सा पद्दतियों के संघर्ष के इस पूरे विवाद को खेदपूर्वक विराम देते हुए मैं अपना वक्तव्य वापिस लेता हूँ और यह पत्र आपको संप्रेषित कर रहा हूं- pic.twitter.com/jEAr59VtEe— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 23, 2021
दरम्यान, अॅलोपॅथीच्या विधानावरून योगगुरू रामदेव यांनी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएने आक्रमक पवित्रा घेतला. एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा डॉक्टरांनी तीव्र विरोध केला होता. कोरोना काळात डॉक्टर घेत असलेले परिश्रम संपुर्ण देश पाहत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. हर्ष वर्धन यांच्या पत्राला उत्तर देताना रामदेवबाबा म्हणाले की, “हे प्रकरण शांत करायचे आहे. डॉ. हर्ष वर्धन, आपले पत्र आले. त्यासंदर्भात, वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो. मी हे पत्र तुम्हाला पाठवत आहे.”
आपले अॅलोपॅथीबाबतचे विधान संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारे आहे. त्या वक्तव्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मनोबलास धक्का पोहोचू शकतो आणि करोनाविरोधातील आपली लढाई कमकुवत होऊ शकते, असे डॉ. हर्षवर्धन यांनी रामदेव यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.