CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण ९२.५१ टक्क्यांवर

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ४२ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५१ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मागच्या २४ तासात २२ हजार १२२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५९ टक्के इतका आहे.
राज्यात आजपर्यंत ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५६ लाख २ हजार १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. राज्यात २७ लाख २९ हजार ३०१ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २४ हजार ९३२ जणं संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ३ लाख २७ हजार ५८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्हावार रुग्णसंख्या अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई- २८,२९९
ठाणे- २४,३३७
पुणे-४८,२५८
कोल्हापूर- १४,७१३
नाशिक- १३,७१४
औरंगाबाद- ६,७२३
नागपूर- १६,५६२
पुण्यात एकाच दिवसात ४९४ रुग्ण नव्याने आढळले, तर ३६ रुग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ४९४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख ६६ हजार ११९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ३६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८ हजार ४३ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान १ हजार ४१० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ४ लाख ४८ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.