SocialMediaNewsUpdate : जिल्हाधिकारी असला म्हणून काय झाले ? एकाच दिवसात गेले पद !!

सूरजपूर : कोरोनामुळे जरी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान शहरात फिरणाऱ्या तरुणाने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याचा फोन फोडून कानशिलात लागवणाऱ्या जिल्हाधिका-यांचा व्हिडीओ शनिवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांचा हा व्हिडीओ होता. दरम्यान या व्हिडिओची गंभीर दखल घेऊन संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल तातडीने पदावरून हटवल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः जाहीर केले आहे. याशिवाय संबंधित आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनीही एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे.
सोशल मीडिया के माध्यम से सूरजपुर कलेक्टर रणबीर शर्मा द्वारा एक नवयुवक से दुर्व्यवहार का मामला मेरे संज्ञान में आया है।
यह बेहद दुखद और निंदनीय है। छत्तीसगढ़ में इस तरह का कोई कृत्य कतई बर्दाश्त नहीं किया जाएगा।
कलेक्टर रणबीर शर्मा को तत्काल प्रभाव से हटाने के निर्देश दिए हैं।
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) May 23, 2021
त्याचे असे झाले कि , शनिवारी अनेक नेटिझन्सनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका देखील केली. सूजरपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाकाळात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील अनेकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. सदर २३ वर्षीय तरूण आपल्या बाईकवरून जात असताना जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी तरुणाला हटकले.
At a time when distressed citizens expect healing touch from administration this behavior of a senior officer has brought shame to all of us.
With experience I can vouch that the IAS comprises of well meaning & sensitive people. This officer is an aberration. An unfortunate one. pic.twitter.com/qIpNEYb7eY
— Arun Bothra 🇮🇳 (@arunbothra) May 22, 2021
जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तरुणाने आधी आपण लस घेण्यासाठी जात असल्याचे सांगितले पण त्याच्याकडची पावती ही लसीकरणाची नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा आपण वृद्ध आजीला भेटायला जात असल्याचे सांगितले पण तरुणाच्या खोटेपणामुळे संतप्त झालेल्या रणबीर शर्मा यांनी त्याचा फोन जमिनीवर आपटून फोडला आणि त्याच्या कानशिलात लगावली इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्यासोबतच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही तरुणाला मारण्यास सांगितले.
थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या प्रकारची माहिती घेऊन ट्विट केले कि , “सोशल मीडियावर सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याकडून एका तरुणाशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही एक दु:खद आणि निंदनीय घटना आहे. छत्तीसगडमध्ये असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. रणबीर शर्मा यांना तातडीने हटवण्याचे निर्देश देण्या आले आहेत”.
https://twitter.com/scribe_prashant/status/1396177010699825155
दरम्यान, रणबीर शर्मा यांनी देखील काय घडले ते सांगून माफी मागितली आहे. “जेव्हा मी त्यांना थांबवलं, तेव्हा ते म्हणाले की मी लस घेण्यासाठी जातो आहे. त्यांनी पावती दाखवली जी लसीकरणाशी संबंधित नव्हती. नंतर ते म्हणाले की मी माझ्या आजीला पाहायला जात आहे. त्यांनी गैरवर्तन केलं आणि मी रागात त्याला कानशिलात लगावली. मी माझ्या या वर्तनासाठी माफी मागतो”, असं रणबीर शर्मा यांनी म्हटलं आहे.