MaharashtraNewsUpdate : दहावीच्या परीक्षेबाबत दोन दिवसात निर्णय : वर्ष गायकवाड

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तर बारावीच्या परीक्षा मात्र घेतल्या जातील असे सांगितले होते. दरम्यान सीबीएसई बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे एकूणच राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेमके काय होणार? या संभ्रमात विद्यार्थी आणि पालकही असताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
याबद्दल बोलताना शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी म्हटले आहे कि , उच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न आणि केंद्र सरकारची परीक्षांबाबतची भूमिका या एकूणच विषयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी येत्या दोन दिवसांत चर्चा होणार असून त्यावेळी परीक्षांच्या मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण होईल. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याचे देखील वर्षा गायकवाड यांनी नमूद केले . त्यामुळे या परीक्षांबाबत येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाला आम्ही आमचे म्हणणे सांगू
दरम्यान, यावेळी बोलताना वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला राज्य सरकारचे प्राधान्य असल्याचं नमूद केले. “सगळ्यांनाच माहिती आहे की तिसऱ्या लाटेची आपण चर्चा करत आहोत. त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर होण्याची शक्यता आहे. कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह असेल, तर तिथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल हे समजून घेतलं पाहिजे. मुले वर्षभरापासून या परीक्षेसाठी तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांचे हित, त्यांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य बघूनच त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये देखील संभ्रम आणि घबराटीचे वातावरण आहे”, असं त्या म्हणाल्या. मुंबई उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षांसदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून ताशेरे ओढले होते. त्यासंदर्भात देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भूमिका मांडली. “उच्च न्यायालयाला आम्ही आमचे म्हणणे सांगू. ही असाधारण परिस्थिती आहे. दुसरी लाट कमी असेल असं वाटले होते . पण कोरोनाची वाढ झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मुलांवर याचा परिणाम व्हायला लागला आहे. न्यायालय यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करेल, अशी मला खात्री आहे”, असेही त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधी यांचा परीक्षा घेण्यास विरोध
दरम्यान काँग्रेसनेत्या प्रियांका गांधी यांनी सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षांविषयीचा मुद्दा उपस्थित करताना म्हटले आहे कि, “सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे की या परीक्षा ऐन करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घेतल्या जात आहेत. त्यांची आरोग्य सुरक्षा महत्त्वाची आहे. आपण धडा का घेत नाही आहोत? बंद जागांमध्ये एकत्र येण्यामुळे कोविडचा प्रसार होतो. दुसऱ्या लाटेने मुलांना करोनाच्या नव्या विषाणूची लागण लवकर होऊ शकते हे दाखवून दिले आहे”. दरम्यान, या ट्विट्समध्ये प्रियांका गांधी यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.
Students studying for the CBSE 12th grade examinations have been sharing their concerns about these exams being held during the second wave of Covid – 19 pandemic.
Their health and safety MATTERS.
Why are we not learning our lessons?
Gatherings in closed.. 1/4 pic.twitter.com/eHoS1U29LG— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 23, 2021