CoronaNewsUpdate : नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनमुक्तांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई : रविवारी राज्यात कोरोनाचे नवे २६ हजार ६७२ रुग्ण आढळून आले. तर गेल्या २४ तासांमध्ये कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा २९, १७७ झाला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा ५१ लाख ४० हजार २७२ झाला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील रुग्णसंख्येचा विचार करता गेल्या दोन महिन्यांमधला हा सर्वात कमी आकडा आहे. पण कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीचा विचार करता सध्या राज्यामध्ये कोरोनाच्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख ४८ हजार ३९५ एवढी आहे. तर राज्यात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ५५ लाख ५३ हजार २२५ वर गेली आहे. तर आतापर्यंतच्या मृतांचा आकडा हा तब्बल ८७ हजार ३०० एवढा झाला आहे.
राज्यात रविवारी कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा हा ५९४ एवढा आहे. त्यामुळं मृत्यूदर ही काहिशी चिंतेची बाब समजली जात आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांचा राज्यातील मृत्यूदर हा १.५९ टक्के एवढा आहे. पुणे आणि मुंबईतील आकडे दिलासा देत असले तरी अहमदनगरमध्ये रविवारी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा ३९ होता. त्यामुळं प्रशासनासमोर ही चिंतेची बाब बनली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा घटला आहे. राज्यातील सद्याचा कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.९ टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण ५१ लाख ४० हजार २७२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.१२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३०,१३,५१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,७९,८९७ (१६.९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,९६,३०६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २१,७७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कालपर्यंत २ कोटी ०७ लाख ५२ हजार ८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.२२ मे रोजी १,२२,१४० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
#COVID19 | Maharashtra reports 26,672 new cases, 29,177 recoveries, and 594 deaths in the last 24 hours.
Total positive cases: 55,79,897
Active cases: 3,48,395 pic.twitter.com/X1UQsOB7qt— ANI (@ANI) May 23, 2021