CoronaMaharashtraUpdate : ४४ हजार ४९३ रुग्णांना डिस्चार्ज , ५५५ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात दिवसभरात ४४ हजार ४९३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, २९ हजार ६४४ नवीन कोरोनाबाधित वाढले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,२४,४१,७७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५,२७,०९२ (१७.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६७,१२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Maharashtra reports 29,644 new #COVID19 cases, 44,493 recoveries and 555 deaths in the last 24 hours.
Total cases 55,27,092
Total recoveries 50,70,801
Death toll 86,618Active cases 3,67,121 pic.twitter.com/yFGswhT6sq
— ANI (@ANI) May 21, 2021
करोनाची आजची स्थिती:
- राज्यात आज ५५५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ % एवढा आहे.
- आज राज्यात २९ हजार ६४४ नवीन रुग्णांचे निदान.
- दिवसभरात ४४ हजार ४९३ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
- आजपर्यंत एकूण ५० लाख ७० हजार ८०१ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७४ % एवढे.
- आजपर्यंत ३ कोटी २४ लाख ४१ हजार ७७६ चाचण्या पूर्ण.
- एकूण नमुन्यांपैकी ५५ लाख २७ हजार ९२ (१७.०४टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
- सध्या राज्यात २७,९४,४५७ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत.
- २० हजार ९४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
महाराष्ट्रात १ जूननंतर लॉकडाउन वाढणार का ?
कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारने १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता, त्यानंतर १ जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारने निर्बंधदेखील कठोर केले आहेत. दरम्यान राज्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी काळ्या बुरशीचे संकट, लसींचा तुटवडा आणि तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी लागणारी तयारी यामुळे लॉकडाउन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.