MaharashtraNewsUpdate : लॉकडाऊनचा कालावधी १ जूनच्या सकाळी ७ पर्यंत , समजून घ्या काय आहेत नियम ? काय चालू ? काय बंद ?

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंबंधी राज्य सरकारकडून नवीन नियमावली आज जारी करण्यात आली आहे. देशाचा रुग्णवाढीचा दर १.४ आहे, तर राज्यात तो ०.८ पर्यंत आहे. देशातील २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेशांच्या एकूण ३६ च्या यादीत महाराष्ट्राचा याबाबत ३० वा क्रमांक आहे. त्यामुळे निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी निर्बंध अधिक वाढवावेत, अशी विनंती केली होती. अखेर, राज्य सरकारने आज याबाबत निर्णय घेतला असून १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यानंतर ३० एप्रिलला लॉकडाऊनच्या निर्बंधांची मुदत संपल्यानंतर लॉकडाऊनमध्ये १५ मेपर्यंत वाढ करण्यात आली होती. राज्यात लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचं चित्र असल्यामुळे आणखी काही दिवस लॉकडाऊन वाढवण्यात यावा, अशी भूमिका मंत्र्यांनी घेतली होती. त्यानंतर आज लॉकडाऊनसंदर्भात नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. तर, काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असे सागंण्यात आले आहे. स्थानिक बाजारपेठा तसेच एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून करोनाच्या नियमांचं पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल. जर एखाद्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणे शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसेच औषधं आणि करोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहतील ही दुकाने
१) किराणा दुकाने
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री
३) भाजीपाला विक्री
4) फळे विक्री
5)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री
6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने
7) पशूखाद्य विक्री
8)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने
9)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने
10)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने
Maharashtra Government extends the current COVID19 restrictions in the state till 7am on 1st June, to fight COVID19; negative RT-PCR report mandatory for those entering the state pic.twitter.com/jjccnpP6KV
— ANI (@ANI) May 13, 2021
जाणून घ्या नवे नियम
- परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना ४८ तासाआधीचा आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक असणार आहे.
- राज्य सरकारने घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर अहवाल बंधनकारक
- मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर व एका क्लिनरलाच प्रवेश मिळणार
- बाजारपेठेत गर्दी झाल्यास स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने त्याबाबत निर्णय घ्यायचा आहे
- दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे
- विमानतळ आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रोमध्ये प्रवासाची मुभा
- इतर राज्यातून महाराष्ट्रात मालवाहतूक करणाऱ्यांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल असावा तो अहवाल ७ दिवस ग्राह्य धरला जाणार