IndiaNewsUpdate : कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब असल्याची टीका त्यांनी केली आहे. देशात केवळ सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधांनांचा फोटो असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वैक्सीन, ऑक्सीजन और दवाओं के साथ PM भी ग़ायब हैं।
बचे हैं तो बस सेंट्रल विस्टा, दवाओं पर GST और यहाँ-वहाँ PM के फ़ोटो।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 13, 2021
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “देशात कोरोनाची लस, ऑक्सिजन आणि औशधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत. उरलंय ते फक्त सेंट्रस विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधानांचे फोटो.”
दरम्यान राहुल गांधींनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन नेहमीच केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या आधी त्यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले होते की, “देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही.” त्याच बरोबर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेवरही टीका केली असून त्यांनी म्हटले आहे की, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाइन बुकिंगचीही सुविधा मिळावी. देशातील कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान मात्र गप्प असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.