CoronaMaharashtraUpdate : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट , रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे तर त्याच दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट वाढत आहे आणि राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचे चित्र आहे. राज्यात आज 58,805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 46,00,196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.01 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 46,781 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्यस्थितीत एकूण 5,46,129 सक्रिय रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,01,00,958 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,26,710 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 36,13,000 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,417 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात 816 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 387 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 193 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 236 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.49 टक्के इतका झाला आहे.
आज महत्वाच्या शहरात आढळलेले रुग्ण
ठाणे – 6818
नाशिक – 6494
पुणे – 12903
कोल्हापूर – 5073
औरंगाबाद – 2159
लातूर – 2908
अकोला – 5042
नागूपर – 5384
एकूण – 46781