IndiaCrimeUpdate : हद्द झाली !! मृतांच्या शरीरावरील कपडे चोरुन “ते ” ब्रॅण्डेड कंपनीचे लोगो लावून पुन्हा बाजारात विकायचे !!

बागपत : कोरोना काळात एकीकडे लोक भयभीत झाले आहेत तर दुसरीकडे भामट्यांनी अनेक उद्योग सुरु केले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात बागपत घडला असून या घटनेत एक टोळी स्मशानात मृतांच्या शऱीरावरील कपडे चोरुन त्यावर ब्रॅण्डेड कंपनीचे लोगो लावून पुन्हा बाजारात विकायचे असे निदर्शनास आले असून या प्रकरणात ७ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे . पोलिसांनी या सात जणांकडून मोठ्या संख्येने कपडे ताब्यात घेतले असून यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन दिली आहे. श्रीपाल जैन, आशीष जैन, राममोहन, अरविंद जैन, ईश्वर, वेदप्रकाश, मोबीन अशी या आरोपींची नावे आहेत.
जनपद बागपत पुलिस ने शमशान घाट व कब्रिस्तान से कफन व वस्त्र चोरी कर बाजार में बेचने वाले गिरोह का किया भंडाफोड, सात अपराधी चोरी किये कफन व वस्त्रों सहित गिरफ्तार।@CMOfficeUP @Uppolice @adgzonemeerut @igrangemeerut pic.twitter.com/FCj4FqkXKT
— Baghpat Police (@baghpatpolice) May 9, 2021
या बाबत बडौत पोलीस स्थानकातील निरिक्षक अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी लॉकडाऊनसंदर्भात पोलीस तपासणी सुरु असताना एका गाडीमध्ये ब्रॅण्डेड कपडे असल्याचे पोलिसांना आढळून आले . यासंदर्भात पोलिसांना शंका आल्याने त्यांनी या कपड्यांच्या खरेदीसंदर्भातील बील आणि इतर कागदपत्रे मागितली. मात्र ही गाडी घेऊन जाणाऱ्यांकडे गाडीतील मालासंदर्भात कुठलीच कागदपत्रे नव्हती. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यावर या लोकांनी आपण कोरोनाबाधित मृतांच्या शरीरावरील कपडे चोरुन विकत असल्याचे कबूल केले. हे लोक मृतांच्या शरीरावरील कपडे चोरायचे. नंतर ते कपडे धुवून त्यावर ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो लावून ते विकायचे. या प्रकरणी पोलिसांनी सात लोकांना अटक केली असून त्यांच्याकडे ५२० मृतदेहावर टाकण्यात येणाऱ्या चादरी, १२७ कुर्ते, १४० पॅण्ट, ३४ धोतर, १२ गरम शाली, ५२ साड्या, तीन रिबिन्सची पाकिट, १५८ ब्रॅण्डेड कपड्यांचे स्टीकर्स सापडले आहेत.
या टोळीकडून हा उद्योग गेल्या दोन वर्षांपासून सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे . मागील वर्षी करोनासारखा संसर्गजन्य रोगामुळे अनेकजण दगावत असतानाही या लोकांनी हा मृतदेहांवरील कपडे चोरण्याचा उद्योग सुरु ठेवला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन गजाआड केले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे बडौतचे रहाणारे आहेत. यामध्ये