CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : ६० हजार २२६ जणांची कोरोनावर मात , ४८ हजार ४०१ नवे रुग्ण

मुंबई : गेल्या २४ तासात आज मुंबईत ६० हजार २२६ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ५७२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत करोना संसर्गावर नियंत्रण येत असतानाच राज्यातील रुग्णसंख्याही आटोक्यात येत आहे. गेल्या महिन्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र, दैनंदिन रुग्णसंख्या आता उतरणीला येत आहे. तसेच, करोना मृतांची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान आज राज्यात करोना रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासात ४८ हजार ४०१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, तब्बल ६० हजार २२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत ४४ लाख ०७ हजार ८१८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे बरे ८६. ०४ टक्के इतके झाले आहे.
राज्यातील करोना मृतांचा आकडाही आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ५७२ जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत ७५ हजार ८४९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
महाराष्ट्रात सध्या ६ लाख १५ हजार ७८३ अॅक्टिव्ह रुग्ण असून यात पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात सध्या १ लाखांच्यावर सक्रिय रुग्ण आहेत. त्या पाठोपाठ मुंबईत ५१ हजार १६५ सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,९४,३८,७९७प्रयोगशाळा नमुन्यांपैकी५१,०१,७३७ (१७.३३टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,९६,८९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,९३९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.