Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : GoodNews : यंदाचा पावसाळा समाधानकारक , 1 जूनला मान्सून केरळमध्ये

Spread the love

मुंबई : देश कोरोनाच्या संकटात असताना शेतकऱ्यांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा देशात पावसाचे  आगमन वेळेत होणार आहे. 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यात 10 जूनपर्यंत तळ कोकणामध्ये आणि मुंबईत पावसाचे  आगमन होईल,असा अंदाज हवामान विभागाने  वर्तवला आहे.

देशाचा विचार करता 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजे वेळेत पावसाचे  आगमन होईल. तर राज्यात तळकोकणामध्ये आणि मुंबईत 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. तर 15 ते 20 जून दरम्यान मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.

एकीकडे मान्सून वेळेत दाखल होणार असल्याची शेतकऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आगामी काही दिवसात संकट येण्याचीही शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस बहुताश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच विजेच्या कडकडाटासह मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूर वेध शाळेने वर्तवली आहे. तर 6 ते 10 मे दरम्यान नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला असल्याने  संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाने  जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 98 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळे  नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही संपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतकऱ्यामुळे  काहीशी चांगली राहिली आहे. त्यामुळं जर शेतकरी सुखात राहिला तर अशा मोठ्या संकटावरही आपण मात करू शकतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!