Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : जिथे गरज आहे तिथे लॉक डाऊन लावता कि आम्ही आदेश द्यावा , हायकोर्टाची मुख्यमंत्र्यांना विचारणा

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : पुण्यासह ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तिथे लॉकडाऊन लावण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असेही कोर्टाने म्हटले आहे. राज्यातील करोना स्थितीचा आढावा मुंबई हायकोर्ट घेत असून सुनावणीदरम्यान ही सूचना करण्यात आली.

Advertisements

सध्या पुण्यात  १.४ लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत राज्यात पुण्यातील रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. अन्य ठिकाणांहून पुण्यात लोक उपचारांसाठी येत असल्याने ही संख्या जास्त असल्याचे सरकारने सांगितले . कोर्टाने यावेळी पुण्यातील संख्या चिंताजनक असल्याचे  म्हटले. तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे असं मत नोंदवले. हायकोर्टाने यावेळी मुंबईतील स्थितीचा आढावा घेतला पाहिजे सांगत जर मुंबई मॉडेलच सुप्रीम कोर्टाने कौतुक केले  असेल तर इतर पालिकांनीही हे मॉडेल स्वीकारले पाहिजे असा सल्ला दिला.

Advertisements
Advertisements

पुणे पालिकेचे वकील कुलकर्णी यांनी यावेळी मुंबईत चांगल्या पायाभूत सुविधा असल्याचं सांगितले . दरम्यान पुण्यातील स्थितीवर बोलताना कोर्टाने तुमचे पालिका आयुक्त मुंबई पालिका आयुक्तांशी का बोलत नाहीत? अशी विचारणा पुणे पालिकेच्या वकिलांना केली. “तुमच्याकडे अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट आहे. तुमच्याकडील पायाभूत सुविधा मुंबईसारख्या चांगल्या नसतील. पण काहीतरी केलं पाहिजे,” असेही  कोर्टाने यावेळी खडसावले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!