IndiaNewsUpdate : देशात ३ लाख ७९ हजार २५७ नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली : देशात एकूण ३ लाख ७९ हजार २५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर याच २४ तासांत ३६४५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याच दिवशी तब्बल २ लाख ६९ हजार ५०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहचली आहे . तर आतापर्यंत देशात एकूण २ लाख ०४ हजार ८३२ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. मात्र, देशात आत्तापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत.
देशात सध्या ३० लाख ८४ हजार ८१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८
उपचार सुरू : ३० लाख ८४ हजार ८१४
एकूण मृत्यू : २ लाख ०४ हजार ८३२
करोना लसीचे डोस दिले गेले : १५ कोटी ०० लाख २० हजार ८१४
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ४४ लाख ७१ हजार ९७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १७ लाख ६८ हजार १९० नमुन्यांची करोना चाचणी एकाच दिवशी (बुधवारी) करण्यात आलीय.