MaharashtraNewsUpdate : १ मे पासून सर्वांना लसीकरण नाही : राजेश टोपे

मुंबई : लसींचा पर्याप्त साठा उपलब्ध नसल्याने सर्वांचे तात्काळ लसीकरण सुरू होणार नाही. दरम्यान सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. नागरिकांनी Co-win App वर नोंदणी करुनच लसीकरण केंद्रावर जावे देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मेपासून लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, राज्यातील नागरिकांना 1 मे पासून लस मिळणार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रच नाही तर इतर राज्य सुद्धा पूर्णपणे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करतील असं मला तरी वाटत नाही. कारण, लसींचा साठा सर्व राज्यांकडे आवश्यक तितका नाहीये असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 45 हून अधिक नागरिकांसाठी वेगळे लसीकरण केंद्र असणार आहे आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र असणार आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं, “आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, राज्यातील 5 कोटी 71 लाख (18 ते 44 वयोगटातील) नागरिकांना मोफत लसीकरण करायचं. त्यामुळे अंदाजे दोन कोटी लशींचे डोस राज्य सरकारला विकत घ्यावे लागणार आहेत त्यासाठी साधारणत: 6 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे.”