SadNewsUpdate : दुःखद : झालंय काय या देशाला ? जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्येही २० रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : एकूणच देशात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असताना देशात अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये कुठे ऑक्सिजनमुळे तर कुठे आगीमुळे लोक मृत्युमुखी पडत आहेत. काल दिल्लीत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे.
Delhi | Oxygen supply to last only half an hour now, more than 200 lives are at stake. We lost 20 people due to an oxygen shortage last night: DK Baluja, Jaipur Golden Hospital
— ANI (@ANI) April 24, 2021
दरम्यान ऑक्सिजन टॅंक लिकेज झाल्याने नाशिकमध्येही रुग्णांचा मृत्यू झाला होता. असाच प्रकार जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये घडला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री २० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डी.के. बालुजा यांनी सांगितले. सध्या रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहिल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे. सध्या या रुग्णालयात २०० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दिल्लीत आणखी ऑक्सिजनअभावी ३५० रुग्णांचे धोक्यात
दिल्लीतील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनाचा तुटवडा भेडसावत असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ३५० रुग्णांचे धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ २५ मिनिते पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक होता. रुग्णालयाने दिल्ली सरकारला एसओएस संदेश पाठवला. त्यानंतर दिल्ली सरकारकडून तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला ८ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ ५०० लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आला असून, केवळ १२ तासच पुरेल इतका साठा असल्याचे रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी म्हटले आहे. त्यामुळे ३५० रुग्णांचे मरण टळले अशीच भयावह स्थिती आहे.