#MaharashtraExam : UGC NET परीक्षाही लांबणीवर

दरम्यान UGC NET परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मंगळवारी २० एप्रिल रोजी पत्रक काढून याबाबत माहिती दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भातील ट्वीट केले आहे.
२०२० सायकलसाठी (मे २०२१) UGC NET ही परीक्षा २ मे ते १७ मे २०२० या कालावधीत संगणकाच्या माध्यमातून होणार होती. परंतु सध्याची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे पाहता पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे एनटीएने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सध्या ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी केव्हा घेतली जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. परीक्षेच्या १५ दिवस अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्या तारखांबाबत माहिती दिली जाईल. असे ही एनटीएने सांगितले . तसेच एनटीए आणि युजीसीची वेबसाईटही पाहत राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अधिक माहिती घेण्यासाठी एनटीएचा हेल्पलाईन क्रमांक 011-40759000 यावर संपर्क साधू शकता. तसंच [email protected] यावर ईमेल पाठवूनही माहिती घेता येईल.