MaharashtraCoronaUpdate : राज्यात ५८ हजार ९२४ नवे रुग्ण, ३५१ मृत्यू , नागपुरातील परिस्थिती हाताबाहेर

मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. काल ही संख्या ६८ हजार ६३१ इतकी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी घट झाली असून हा फरक ९ हजार ७०७ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ५२ हजार ४१२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ४५ हजार ६५४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७६ हजार ५२० वर जाऊन पोहचली आहे.
आज राज्यात एकूण ३५१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४१९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५६ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ५२ हजार ४१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ३१ लाख ५९ हजार २४० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.०४ टक्क्यांवर आले आहे.
राज्यात ६,७६,५२० सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७६ हजार ५२० इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २५ हजार ०९६ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८५ हजार ३२१ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ८० हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७६ हजार ९६१ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजार ३३५ इतकी आहे. या बरोबरच अहमदनगरमध्ये १९ हजार ९८३ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ३९३, नांदेडमध्ये ही संख्या १३ हजार ४९७ इतकी आहे. जळगावमध्ये १३ हजार १२२, तसेच तर रायगडमध्ये एकूण १२ हजार २३३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ५ हजार ७५४, तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ५६९ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार २५३ इतकी आहे.
३७,४३,९६८ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख ७५ हजार ८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८ लाख ९८ हजार २६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७ लाख ४३ हजार ९६८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २७ हजार ०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
नागपुरात परिस्थिती हाताबाहेर
दरम्यान नागपूर जिल्ह्यात करोना बाधितांच्या मृत्यूचे तांडव दिवसेंदिवस अधिक भयंकर होत चालले आहे. गेल्या १३ महिन्यांपासून दोनअंकी असलेला मृत्यूचा आकडा प्रथमच शंभरपार झाल्याने नागपूरच्या उरात धडकी भरली आहे. जिल्ह्यात दिवसभरात आतापर्यंतच्या सर्वाधिक ११३ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यातील ७५ मृत्यू शहरात झाले आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, आणखी ६ हजार ३८६ बाधितांची आज भर पडली.