CoronaMaharashtraUpdate : राज्यात ६३ हजार ७२९ नवे रुग्ण , ३९८ मृत्यू , ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण

गेल्या काही महिन्यांतील हा सर्वाधिक आकडा । पुणे, मुंबई, ठाण्यातील स्थिती भीषण
करोना : आजचे अपडेट
- नवीन रुग्ण : ६३ हजार ७२९
- डिस्चाज ४५ हजार ३३५
- राज्यात आजपर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : ३० लाख ४ हजार ३९१
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) : ८१.१२ टक्के
- आजचे मृत्यू : ३९८ । राज्यातील मृत्यूदर १.६१ % एवढा.
- आजपर्यंत करण्यात आलेल्या तपासण्या : २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
- सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
- राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, आज ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.
Maharashtra reports 63,729 new #COVID19 cases, 45,335 discharges and 398 deaths
Total cases: 37,03,584
Total recoveries: 30,04,391
Death toll: 59,551
Active cases: 6,38,034 pic.twitter.com/bsVVdH70y1— ANI (@ANI) April 16, 2021
दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुणे, मुंबई, ठाण्यातील स्थिती भीषण
राज्यात सध्या करोनाचे ६ लाख ३८ हजार ३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख १६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात ८४ हजार ३७८, ठाणे जिल्ह्यात ८४ हजार ३८, नागपूर जिल्ह्यात ७१ हजार ५३९, नाशिक जिल्ह्यात ४९ हजार ९२५ अशी सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. राज्यातील अन्य प्रमुख शहरांतही करोनाची स्थिती भीषण बनली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात आज ८ हजार ८०३ नवीन रुग्णांची भर पडली तर पुणे पालिका क्षेत्रात ५ हजार ४३७ नवीन रुग्ण आढळले.