CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित, ३४९ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात ६१ हजार ६९५ नवीन करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६३ टक्के एवढा आहे. दरम्यान, आज ५३ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २९,५९,०५६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.३ टक्के एवढे झाले आहे.
Maharashtra reports 61,695 new #COVID19 cases, 53,335 recoveries & 349 deaths in the last 24 hours.
Total cases: 36,39,855
Total recoveries: 29,59,056
Death toll: 59,153
Active cases: 6,20,060 pic.twitter.com/M1SbJ1FEpw— ANI (@ANI) April 15, 2021
दरम्यान आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३६,३९,८५५ (१५.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,२७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे शहरात दिवसभरात ५ हजार ३९५ करोनाबाधित आढळले असून, ४९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या आजअखेर ३ लाख ४९ हजार ४२४ झाली आहे. तर आजपर्यंत ५ हजार ९५१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ४ हजार ३२१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ८९ हजार १२२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.