CoronaMaharashtraUpdate : राज्यात ५५ हजार ४११ नवे रुग्ण तर ३०९ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ५५ हजार ४११ नवीन करोनाबाधित वाढले असून, ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के एवढा आहे.राज्यातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.
Maharashtra reports 55,411 new #COVID19 cases, 53,005 recoveries and 309 deaths in the last 24 hours
Total cases: 33,43,951
Total recoveries: 27,48,153
Death toll: 57,638
Active cases: 5,36,682 pic.twitter.com/58lLK158BH— ANI (@ANI) April 10, 2021
दरम्यान, आज ५३ हजार ००५ रुग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१८,५१,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३३,४३,९५१ (१५.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,४१,०८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,२९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, “रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाउनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाउनसारखी परिस्थिती उद्भवेल.”, असं सूचक विधानही केलं. त्यामुळे राज्यात लवकरच लॉकडाउनबाबत मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचं दिसत आहे.
पुण्यात दिवसभरात ४ हजार ९५३ करोनाबाधित वाढले, ४६ रूग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ९५३ करोनाबाधित वाढले असून, ४३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख २२ हजार ९८२ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ७०० रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान आज ४ हजार ३८९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजअखेर २ लाख ६६ हजार ८०९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.