MumbaiNewsUpdate : मनसे नेते राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यावर कंबरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत राज्यातील सर्व महत्वाच्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते .या बैठकीला राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते पण ते रुग्णालयात दाखल असल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नसून शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्यात टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. त्यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याची माहिती तेव्हा समोर आली होती.