AurangabadNewsUpdate : पोलिसांच्या इतर तपासावर परिणाम नाही : डाॅ. निखिल गुप्ता

औरंगाबाद : कोरोनामुळे शहरात उदभलेली परिस्थिती पोलिसांसाठी आव्हानात्मक असली तरी पोलिसांच्या इतर कामकाजावर किंवा गुन्ह्यांच्या तपासावर कोणताही परिणाम झाला नाही. माझे सर्व सहकारी अधिक परिश्रम घेत आपली कामे पूर्ण करत आहेतअशी माहिती पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी दिली. शहरात कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीला हाताळण्यासोबतच प्रत्येक पोलिस ठाण्यातील तपासिक अंमलदार त्यांच्याकडे असलेले तपास पूर्ण करत आहेत असेही डाॅ.गुप्ता म्हणाले.