साधेपणाने साजरी करा आंबेडकर जयंती ; शासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

राज्य शासनाने डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आज जाहीर केल्या असून या सूचनांप्रमाणे १४ एप्रिल रोजी कठल्यही सार्वजनिक मिरवणूक न काढता, १४ एप्रिलच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करता येईल परंतु जमावबंदी असल्याने कोणालाही गर्दी करता येणार नाही . किंवा १३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता रस्त्यावर एकत्र येता येणार नाही.
या मार्गदर्श सूचनेनुसार ;
1) दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमून जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन राज्यात ठिकठिकाणी जयंती साजरी करतात, परंतु यावर्षी असे काहीही न करता १४ एप्रिल रोजी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वी
अत्यंत साधे पणाने जयंती साजरी करतील अशी अपेक्षा आहे.
2) कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे या वर्षी प्रभात फेरी, बाईक रेली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत तसेच ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. त्या ऐवजी कोरोनाच्या नियमांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला , पुतळ्याला अभिवादन करता येईल. दरम्यान मुंबईतील चैत्यभूमीवर ५० लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्री डॉ . बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतील. या सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच नागपूर येथे दीक्षाभूमीवरसुद्धा ५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेता येईल. याशिवाय कुठेही गर्दी करता येणार नाही.
3) याशिवाय कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही. डिजिटल मीडियाचा वापर करून असे कार्यक्रम घेता येतील.
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर आदी आरोग्यविषयक कार्यक्रम प्रशासनाच्या पूर्व परवानगीने घेता येतील मात्र त्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.