न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ एप्रिल अखेरीस संपत आहे. सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमण यांच्या नावाला मंजुरी दिली आहे.
President Ram Nath Kovind appoints Justice NV Ramana as the next Chief Justice of India, with effect from 24th April 2021: Government of India
CJI SA Bobde is due to retire on April 23rd. pic.twitter.com/60LucNp3yH
— ANI (@ANI) April 6, 2021
जेष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांची भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते २४ एप्रिल रोजी पदाची शपथ घेणार आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत असणार आहे. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिल रोजी पूर्ण होत असल्याने, केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया मार्चमध्येच सुरू केली होती. केंद्र सरकारने सरन्यायाधीश पदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते.