CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४७ हजार २८८ नवे करोनाबाधित , ५५ रूग्णांचा मृत्यू

मुंबई : गेल्या २४ तासात दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, आज २६ हजार २५२ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८३.३६ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Mahrashtra reports 47,288 new #COVID19 cases, 26,252 discharges and 155 deaths.
Total cases: 30,57,885
Total discharges: 25,49,075
Death toll: 56,033
Active cases: 4,51,375 pic.twitter.com/a9YLlwdzsu— ANI (@ANI) April 5, 2021