MumbaiNewsUpdate : देशभरात एप्रिलच्या पहिल्याच दिवशी अमिताभसह 15.28 लाख लोकांनी घेतली लस

मुंबई : एक एप्रिलला देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी 15.28 लाख जणांनी कोरोना लस घेतली आहे. याशिवाय बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. आपल्या ब्लॉगवरुन त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, व्हॅक्सिनेशन डन, संपूर्ण कुटुंबाची आणि स्टाफची कोरोना चाचणी केली. सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यानंतर लस घेतली आहे. तो सध्या कामानिमित्त बाहेर असून लवकरच घरी परतेल, असेही त्यांनी सांगितलं आहे.
T 3861 –
Got it done !
My CoviD vaccination this afternoon ..
All well .. 🙏— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 1, 2021
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 6.75 हून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात आरोग्य कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात कर्मचारी, साठ वर्षावरील व्यक्ती आणि विशिष्ठ आजारांनी ग्रस्त असणाऱ्या 45 वर्षावरील व्यक्तींचाही समावेश आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रसार पाहाता सरकारनं सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीदेखील खासगी आणि सरकारी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाची मोहिम सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत पत्र लिहिले असून यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यास सांगितले आहे.