IndiaNewsUpdate : मोठी बातमी : भाजप उमेदवारांच्या गाडीत EVM आढळले , चार जण निलंबित

गुवाहाटी : आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन (EVM) आढळून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापले आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधा गुन्हा दाखल झाला आहे. ईव्हीएम घेऊन जाणारी गाडी रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणात निवडणूक आयोगाने केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर चार जणांना निलंबित केले आहे.
EC issues factual report on incident involving EVM in Assam.
Polling party 149-Indira MV School of LAC 1 Ratabari (SC) met with incident. Party comprised a Presiding Officer & 3 polling personnel. They were accompanied by police personnel comprising a constable & a homeguard:EC pic.twitter.com/irm3DEr6KV
— ANI (@ANI) April 2, 2021
याबाबत निवडणूक आयोगाने केलेल्या खुलाशात ईव्हीएम प्रशासनाच्या ताब्यात असून स्ट्राँग्र रुममध्ये सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर ईव्हीएम घेऊन जाणारी गाडी रोखणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. पुढील तपास सुरू आहे. जवामाने केलेल्या हल्ल्यात ईव्हीएमचे कुठलेही नुकसान झालेले नाही. असे आयोगाने म्हटले आहे.
काँग्रेसचा हल्ला बोल
काँग्रेसने या घटनेवरून हल्लाबोल केला आहे. प्रत्येक निवडणुकीत अशाच घटना घडतात. निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. मग ईव्हीएम मशिन भाजपशी संबंधित एका कारमध्ये ठेवण्यात आली. पण या घटनेवरून वाद निर्माण झाल्यावर अधिकाऱ्यांना त्याची माहिती कळते. जनतेचा निवडणुकीवरील विश्वास उडू नये यासाठी निवडणूक आयोगाने स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे, असं आसाममधील काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
https://twitter.com/atanubhuyan/status/1377684745023221765
आसाममध्ये गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातले मतदान झाले . या मतदानानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात पथरकंडी येथील भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल यांच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन ठेवल्याचं दिसून येत आहे. पण निवडणूक आयोग आणि भाजपकडून अद्याप या घटनेवर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
व्हायरल व्हिडिओत काय आहे ?
पांढऱ्या रंगाच्या जीपमध्ये (क्रमांक AS 10B 0022) ईव्हीएम दिसून येत आहे. ही जीप कृष्णेंदु पॉल यांची असल्याचं व्हिडिओत काही जण बोलत आहेत. यानंतर काँग्रेस खासदार प्रद्युत बोरोदलई आणि गौरव गोगोई यांनी ट्वीट करून भाजपने ईव्हीएम पळवल्याचा आरोप केला. दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, शशी थरूर यांच्यासह अनेकांनी शेअर केला. प्रत्येक वेळा असे व्हिडिओ समोर येतात. ज्यात खासगी गाड्यांमध्ये ईव्हीएम नेताना पकडले जातात. या गाड्या भाजप उमेदवारांशी संबंधित असतात. पण नंतर हे खोते असल्याचे सांगून फेटाळले जाते . निवडणूक आयोगाने तक्रारींवर कारवाई करण्याची तसेच सर्व पक्षाकडून ईव्हीएम मशीनची पुर्नतपासणी करणे आवश्यक आहे,” असे ट्वीट प्रियांका गांधी यांनी केले आहे.